देवीच्या स्थानी आलेले अनुभव.
१. रणरणत्या उन्हात पाय भाजतात. परंतु प्रत्यक्ष देवीच्या मुर्तीस्थानाचा कातळ मात्र थंडगार लागतो.
२. दु. १२ वा. नैवेद्य दाखविल्यावर वावटळ उठून ती मुळ डोंगरावरील स्थानाकडे जायची.
३. आमची सर्व मुले डोंगरात मुळ स्थानावरती गेली होती. परंतु बराच वेळ झाल्यावर ती परतली नाहीत म्हणून आम्ही शोधण्यासाठी, अर्धा डोंगर चढून गेल्यावर तेथील भक्तांनी आम्हाला सांगितले कि, तुमच्या पुढे एक लहान मुलगा व मुलगी मंदिराकडे धावत येत होते, म्हणून माघारी येउन विचारले कुठे आहेत ते? तर आम्हाला कुणीच दिसले नाही. परंतु काही वेळातच मुले परत आली.
४. कुपनलिकेसठी भूजल सर्वेक्षण अधिकारी आमच्या बरोबर आले होते. तेव्हा त्यांनी संपूर्ण परिसराचे परीक्षण केले. त्यांनी सांगितले कि, येथे पाणी लागणे अशक्य आहे. कातळ फार कडक आहे. दिलीप, निनाद, सुनील यांनी देवीला मनोभावे प्रार्थना केली कि, पाणी भक्तांना पाहिजे आहे. सर्वांसाठी तुझी प्रचीती मिळू दे. आश्चर्य म्हणजे आम्ही व भूजल अधिकारी मंदिराजवळील परिसराचे परीक्षण केले असता, तेव्हा येथेच पाणी लागेल असा आम्हाला संकेत मिळाला. प्रत्यक्षात जेव्हा त्या जागी खणण्यास सुरुवात केली तेव्हा केवळ ८५ फुटावर पाण्याचा झरा लागला व पुढे २४० फुटापर्यंत मधुर पाण्याचा साक्षात्कार अनुभवण्यास मिळाला. आजतागायत बारा महिने सदर कुपनलिकेस पाणी उपलब्ध असते. आसपासचे गावकरी आणि प्राणीमात्रांना हि गंगा अंगणी असल्याचे आम्हाला समाधान वाटते.