आख्यायिका
डोंगरावर गुरे चरित असलेल्या एका गुराख्याला एका वृद्ध बाईने डोंगराखाली घेऊन जाणेची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार त्या गुराख्याने त्या वृद्धेला खांद्यावर घेऊन तो खाली आला. त्या वृद्धेने आपल्या जवळचे गाठोडे त्या गुराख्यास बक्षीस देऊन टाकले. त्याने ते घेतले तेव्हा ते जड लागत होते. परंतु थोड्या वेळाने ते हलके लागू लागले त्यामुळे त्याने ते उघडून पहिले असता त्यात दगड दिसले. ते त्याने तेथेच टाकून दिले व तो घरे आला. वैतागून त्याने आपले घोंगडे दूर भिरकावून दिले. तेव्हा घोङ्गड्यातुन एक धातू जमिनीवर आदळल्याचा आवाज आला. उत्सुकतेने त्याने पहिले असता तो एक सोन्याचा तुकडा होता. तो परत दगड टाकले त्या ठिकाणी धावत गेला. तेथे जाऊन त्याने ते दगड उचलण्याचा प्रयत्न केला असता, ते तेथेच घट्ट बसले होते. ती वृद्ध बाई म्हणजे साक्षात देवी असणार याबद्दल त्याची खात्री पटली.
तेच हे मूळ स्थान. तेव्हा पासून तेथे पूजा अर्चा सुरु झाली.