Rituals

परंपरा
कारव्याच्या डोंगरावर श्री अंताजी जयवंत यांना सुपारी मिळाली ती त्यांनी आपल्या बंडीम ध्ये ठेवली. रात्री झोपले असताना त्यांना वेगवेगळे आवाज यायला लागले कि, मला बंडीत का ठेवले आहे. मला देवघरात ठेव व माझी रोज पूजा करीत जा.

देव्हाऱ्यात ठेवलेल्या देवीची पूजा करताना काही दिवसांनी सुपारीचा आकार मोठा होऊन तिला देवीचे स्वरूप येण्यास सुरवात झाली. या गोष्टीचा गवगवा  झाला व  त्यामुळे तिने कवच टाकले व ती मूळ रुपात स्थिर झाली.

जयवंत कुटुंबातील ज्येष्ठांच्या सल्याप्रमाणे सुपारीच्या आकारातील चांदीचे गडू घडवून त्याला नक्षीदार झाकण बसवून जयवंत घराण्यातील पाच प्रमुख घराण्यात सुपूर्द करण्यात आले होते.

सुपारीचे मूळ स्थान किशोर चंद्रकांत जयवंत, महागिरी ठाणे येथे आजही आहे. तेथे नवरात्रोत्सव व वर्षाचे सर्व मानपान दिले जातात.
नवरात्रात नऊ दिवस एकच कुमारिका (वयोगट – २ ते ९ वर्षे ) पूजतात, आणि उठता बसता एक सवाशीण पुजली जाते. ललिता पंचमीची पूजा नवरात्राच्या पंचमीला दुपारी केली जाते, एक सवाशीण पुजली जाते.